शिंदेचे ‘मनसे’ स्वागत होणार ? ; मनसेत जाण्याचा शिंदेंना भाजपाचा सल्ला

0
9

मुंबई : राज्यात सद्या वातावरण ढवळून निघाले असून एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना नाकीनऊ आणले आहे. शिंदेंनी राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. शिंदे तूर्तास सेनेवर दावा करत असेल तरी कायदेशीर दृष्ट्या ते अडचणीचे आहे, आमदारांचा गट कायद्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी प्रक्रिया करत एका पक्षात विलीन करणे महत्वाचे आहे, भाजपमध्ये विलीन झाल्यास प्रचंड रोष ओढवण्याची शक्यता आहे. यामुळे शिंदे यांच्यासमोर मनसे हा पर्याय असल्याची माहिती आहे. याबाबतची कायदेशीर लढाई आज सुप्रीम कोर्ट मध्ये सुरू होणार आहे. त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. मनसेत विलीन व्हावे असे भाजप नेत्यांनी सांगितल्याचीही माहिती आहे.

सद्या राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना रंगला असताना शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांना फोन करून त्यांच्याशी राजकीय चर्चा केल्याचे वृत्त आहे. ‘एएनआय’या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. शिंदे व ठाकरे यांच्यात एकवेळा चर्चा झाली असून, महाविकास आघाडी मधून 39 शिवसेना आमदार बंड करून बाहेर पडले आहेत. त्यामुळे सरकार फूटीच्या उंबरठ्यावर आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई हे शिंदेच्या संपर्कात असून एकनाथ शिंदे हे असा आपला गट राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये विलीन करण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे, शिंदे यांनी रविवारी राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी राज ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत विचारणा केली. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील चर्चा केल्याची माहिती आहे. एका मनसेनेत्यांने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलेले अपक्ष आणि शिवसेना आमदारांचे बंड आता नव्या वळणावर आले आले. त्यांचा गट विलीन करायची वेळ आल्यास राजकीय पर्यायांची चाचपणी करताना त्यांच्याकडे मनसेचा पर्याय आहे. सध्या मागील काही दिवसांत एकनाथ शिंदे-राज ठाकरे यांच्यात 1 वेळेस चर्चा झाली आहे. या चर्चेमध्ये एकनाथ शिंदेंनी राजकीय परिस्थिती आणि राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र येत्या दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here