मुंबई : खाद्य तेल (Edible oil rates reduced) उत्पादकांनी पाम, सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या किमतीत १५ रुपयांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात किमत कमी झाल्यामुळे देशांतर्गत किमतीही कमी करण्याचा निर्णय खाद्य तेल उत्पादकांनी घेतला आहे.
खाद्य तेल उत्पादन करणाऱ्या सर्वच मोठ्या कंपन्यांनी किमती कमी (Edible oil rates reduced) केल्या आहेत. अदाणी विलमर, रुची सोया, जेमिनी एडिबल्स ॲण्ड फॅट्स इंडिया, मोदी नॅचरल्स, गोकुल री-फॉयल ॲण्ड सॉल्वंट, विजयसॉल्वेक्स, गोकुळ ॲग्रो रिसोर्सेस आणि एन. के. प्रोटीन यांचा त्यामध्ये समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार किमती कमी झाल्यामुळे तेलाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. किरकोळ क्षेत्रातील महागाईही त्यामुळे कमी होईल. खाद्य तेल(Edible oil rates reduced) व स्निग्धांश श्रेणीतील महागाई मेमध्ये १३.२६ टक्क्यांवर होती.
हे सुद्धा वाचा :
भाजपाच्या खोट्या अफवांना बळी पडू नका, संजय राऊत म्हणाले…
पामतेल ७ ते ८ रुपयांनी कमी झाले तर, सूर्यफूल १० ते १५ आणि सोयाबीन ५ रुपयाने कमी करण्यात आले आहे. मागील एक वर्षात खाद्य तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. हा सरकारसाठी चिंतेचा विषय आहे. जागतिक बाजारातील दरवाढीमुळे (Edible oil rates reduced) किमती वाढल्या होत्या.
हैदराबादमधील जेमिनी एडिबल्स ॲण्ड फॅट कंपनीने गेल्या आठवड्यात फ्रीडम सूर्यफूल तेलाच्या (Edible oil rates reduced) एक लिटर पाऊचची किंमत १५ रुपयांनी कमी करून २२० रुपये केली होती. आता २० रुपयांची कपात होऊन किंमत २०० रुपये होईल.
पावसाच्या प्रतिक्षेत बळीराजा हवालदिल
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम