Eco friendly cremation : इथे मरणाचे सरण हि देऊन जाते पर्यावरण संवर्धनाच संदेश

0
10

Eco friendly cremation : सुरगाणा शहरात उद्धव रामचंद्र मुसळे वय ७८ यांचे वृध्दापकाळाने निधन झाले होते. अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडे नसल्याने नातेवाईकांना चिंता सतावत होती. अशातच देवळा तालुक्यातील कनकापुर येथील सोन शाम गो संवर्धन व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेमार्फत गोव-या जाळून अंत्यविधी, अंतीम संस्कार सेवा गृप कसमादे मार्फत करण्यात येतात.

 

या गो शाळेचे संचालक भाऊसाहेब शिंदे यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यांनी तात्काळ पाचशे ते सहाशे गोव-या पाठवून अंतिम संस्कार केले. तालुक्यात अपरिमित सुरु असलेल्या वृक्ष तोडी मुळे सागवान, खैर तसेच इतर इंजायली लाकूड संपुष्टात आले आहे. अंतिम संस्काराकरीता लाकूड मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे नातेवाईकांनी गोव-या वापरून अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.हा निर्णय अत्यंत स्तुत्य असा उपक्रम असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. तालुक्यात प्रथमच गोव-या वापरून अंत्यसंस्कार केले आहेत.

 

लाकडांना पर्याय म्हणून या निर्णया कडे बघितले जाते आहे. गो शाळेचे संचालक शिंदे यांनी सांगितले की,गो पालना बरोबरच वृक्ष संवर्धन, प्रदूषण मुक्त गोमय अंत्यविधी अंत्यसंस्कारा करीता गोव-या वापरल्याने निसर्गाचे संवर्धन तर होतेच त्याच बरोबर वृक्षतोड करावी लागत नसल्यामुळे निसर्गाचा समतोल राखला जातो. देशी गायीच्या शेणाची गोवरी वापरल्याने हवेमध्ये तेवीस टक्के प्राणवायूची निर्मिती होत असते. तसेच राखे मध्ये प्राणवायूचे प्रमाण असल्याने त्या राखेचा उपयोग शेतात खत म्हणून वापरता येते. त्याप्रमाणे झाडे लावली तर खड्डयात खत म्हणून राखेचा उपयोग होतो. आज बरेच शेतकरी शेंद्रिय शेती करतात.या साठी राखेचा उपयोग होतो. सदर उपक्रम एक वर्षापासून सुरू केला असून पिंपळनेर, मनमाड, मालेगाव, सटाणा, देवळा, कळवण या भागात व परिसरात दोनशे पेक्षा जास्त मृतदेहांवर गोवरी वापरून अंत्यसंस्कार केले आहेत. कत्तल खान्यात घेऊन जाणा-या देशी, गावठी भाकड गायी या गो शाळेत सांभाळून त्यांना नेसर्गिक जंगलात चारण्यासाठी घेऊन जातात. सुमारे सव्वाशे पेक्षा जास्त गायी या गो शाळेत आहेत. भाऊसाहेब शिंदे, दत्तात्रेय जाधव, सतीश देवरे, समीर पगार, भास्कर चव्हाण, किशोर शिंदे, सुनिता शिंदे हे पदरमोड करून शासनाचे एक हि रुपयांचे अनुदान न घेता गोशाळा चालवित आहेत.

 

अंत्यसंस्कारासाठी बनविण्यात आलेल्या गोव-या.
प्रतिक्रिया- गोमय अंत्यविधी संस्कार गेल्या एक वर्षा पासून हा पर्यावरण पूरक उपक्रम आमच्या गो शाळे तर्फे राबविण्यात येत आहे. यामुळे वृक्षांची कत्तल केली जात नाही. वृक्ष संवर्धना बरोबरच अस्थि विसर्जन झाल्यावर राखेचा उपयोग शेतात, झाडांना खत म्हणून वापरता येते. यासाठी अल्प खर्च येत असून वृध्दाश्रम, माजी सैनिक, बेवारस मृत देहांवर सामाजिक जबाबदारी म्हणून संस्थे मार्फत कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता मोफत अंतीम संस्कार केले जातात. पारंपरिक लाकूड वापरून अंत्यसंस्कार केले जातात. याला हळूहळू फाटा देत याकडे नातेवाईक वळत आहेत. दिवसेंदिवस या मागणीत वाढ होत आहे.

भाऊसाहेब शिंदे. अध्यक्ष अंत्यसंस्कार सेवा गृप कनकापुर देवळा.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here