The point now – हिवाळ्यात चयापचय खूप मंद होतो, त्यामुळे अशा गोष्टींचे सेवन करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून तुमचे शरीर योग्यरित्या कार्य करू शकेल. आणि तुम्ही निरोगी राहाल.
• पालक, मासे, पौष्टिक भाज्या , मेथी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. या सर्वांमध्ये झिंक मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे पचनक्रिया सुधारते.
• मूळ भाज्या गाजर, मुळा, बीटरूट यांसारख्या भाज्या थंडीचा सामना करण्यास मदत करतात. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी मुबलक प्रमाणात आढळते. ते खाल्ल्याने कर्करोग आणि हृदयाचे आजार बरे होतात.
• व्हिटॅमिन डी समृद्ध असलेल्या गोष्टी चिंता आणि नैराश्य दूर करण्यास मदत करतात. अंड्यातील पिवळ बलक, दूध, मशरूममध्ये व्हिटॅमिन डी मधे आढळते.
• थंडीच्या ऋतूमध्ये गोड पदार्थांची लालसा अधिक असते. आपल्याला काही ना काही खाण्याचे इच्छा होत असते मूड चांगले करणारे पदार्थ जसे सॅल्मन, चिया सीड्स, अंडी, आंबवलेले पदार्थ, चॉकलेट आणि गोड बटाटे (रताळू)यांचा आहारात समावेश करणे महत्त्वाचे आहे.
• ऊर्जा वाढवणारे पदार्थ-थंडीच्या ऋतूमध्ये थकवा आणि आळस खूप जाणवतो. त्यामुळे काम करण्याची इच्छा होत नाही. अशा परिस्थितीत अंडी, संत्री, पालक, ओटमील, बीन्स यांसारख्या गोष्टींचे सेवन करावे. हळद दालचिनीचाही आहारात समावेश करा.
•गुळ- हिवाळ्यात गुळ हे सुपरफूड मानले जाते. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स, झिंक आणि मिनरल्स असतात. त्यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते.
• ड्राय फ्रुट्स अँड नट -त्यामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड असतात जे हृदयाच्या आरोग्याला चालना देतात. तसेच यामध्ये मॅग्नेशियम आढळते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
• मध-मधामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मऍसिड आढळतात जे तुम्हाला सर्दी आणि खोकल्यापासून वाचवतात. यासोबतच ते खाल्ल्याने थंडीचा त्रासही कमी होतो. या गोष्टींचा समावेश तुम्ही रोजचा तुमचा अन्नात केला तर तुमची रोगप्रतिकार शक्ती ही वाढू शकते .त्यामुळे तुम्हाला जास्त करून आजार होणार नाही आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची उत्तमपणे निगा राखू शकता. अशाच काही उपयुक्त टिप्स साठी वाचत राहा द पॉईंट नाउ.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम