दुबईचे वाळवंट झाले जलमय, मोडला २७ वर्षांचा पावसाचा रेकॉर्ड

0
33

मुंबई – गुरुवारी संयुक्त अरब अमिरातीतील दुबईत मुसळधार पाऊस पडला आणि तिथले रस्ते, वाळवंट जलमय झाले. मुसळधार पावसामुळे यूएईच्या पूर्वेकडील भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. तसेच अनेक वाहने वाहून गेली आणि तिथल्या घरांचे नुकसान झाले, त्यामुळे अनेकांना हॉटेल्सचा आसरा घ्यावा लागला.

हवामानातील या अचानक बदलामुळे, यूएईच्या हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला, असे खलीज टाईम्सच्या अहवालात म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोज आणि व्हिडिओमध्ये पावसामुळे महामार्गावर वाहने पाण्यात तरंगताना दिसत आहेत.

अल अरबिया इंग्लिशने नोंदवले की यूएईच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वीसहून अधिक हॉटेल्सच्या संपर्कात आहे ज्यात पुरामुळे विस्थापित झालेल्या १,८८५ पेक्षा जास्त लोकांचा समावेश आहे. तिथल्या हवामान खात्याने म्हटले आहे की, या देशातील पावसाने २७ वर्षांचा विक्रम मोडला आहे.

हवामानबदलाची आताची भीषण उदाहरणे

साधारणपणे दुबईतील उन्हाळा हा कोरडा आणि अत्यंत उष्ण असतो. भारतातही राजस्थानसारख्या वाळवंटी भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे अनेक शहरात रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाळवंटातील पाऊस आणि युरोपीय देश आणि ब्रिटनमधील वाढत्या तापमानामुळे जंगलात पसरणारी आग ही हवामानबदलाची आताची भीषण उदाहरणे आहेत. काही दिवसांपूर्वी, इंग्लंड या सर्वात थंड देशाने इतिहासातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद केली जेव्हा तापमान ४० अंश सेल्सिअसवर गेले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here