देवळा तालुक्यात जलसंधारणाची कामे मंजूर – आ . डॉ राहुल आहेर

0
45

देवळा : अटल भुजल योजनेंतर्गत पुरवठा आधारीत जलसंधारण कामांसाठी देवळा तालुक्यातील १६ कामांसाठी १० कोटी ३५ लाख ७८ हजार पाचशे रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आ.डॉ.राहुल आहेर यांनी दिली.

देवळा तालुक्यातील प्रशासकीय मान्यता मिळालेले गेंटेड सिमेंट काँकरीट बंधारे पुढील प्रमाणे ; खर्डे( ३ ),शेरी (१) , व-हाळे( १) ,वाजगाव्( १) ,सांगवी (१), विजयनगर (१), वासोळ (१), कनकापूर (१), दहिवड( १), गुंजाळनगर (१), वाखारी (१), फुलेमाळवाडी( १०,मेशी (१), गिरणारे ( १) याप्रमाणे कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून , सदर बंधाऱ्याच्या कामांमुळे देवळा तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यास तसेच जलसाठा वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे आ.डॉ.राहुल आहेर यांनी सांगितले.

या कामांमुळे भविष्यात पाणी टंचाई जाणवणार नाही . यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे . दरम्यान, नागरिकांनी सदर कामे चांगल्या प्रतीची करून घ्यावीत , कामांबाबत तक्रार आल्यास संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा शेवटी आमदार डॉ राहुल आहेर यांनी दिला आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here