Dr bharti pawar: डॉ. भारती पवार यांना देवळा तालुक्याने भरभरून दिले. अगदी राजकीय कारकीर्द देखील याच तालुक्यातून सुरू झाली. त्यात वाखारी गावाने तर पवार यांना गावाची लेक म्हणून लेकीच्या झोळीत भरपूर दिले. मात्र याच लेकीला आज माहेरचा विसर पडल्याचे चित्र आहे. मंत्री झाल्यानंतर लेक मतदार संघाचा कायापालट करेल अस सर्वानाच वाटत होते मात्र, या मतदारांच्या स्वप्नांवर वरवंटा फिरल्याची कुजबुज आता व्हायला लागली आहे. आपल्या लेकीचे कान टोचण्याचे काम माहेरच्या नागरिकांनी पत्राद्वारे केले. यानंतर तरी लेक माहेरकडे लक्ष देणार का ? याकडे बघणे महत्वाचे असेल. (Dr bharti pawar news)
Ajit Pawar: ‘…तर राष्ट्रवादीचे काही नेते तुरुंगात गेले असते’….
लोकसभा मतदार क्षेत्राकडे विकासात्मक लक्ष देण्यात यावे , अशी आर्त मागणी तालुक्यातील वाखारवाडी (श्रीरामपूर ) येथील ग्रामस्थांनी केंद्रीय राज्यमंत्री व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार ना डॉ भारती पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ना .पवारांनी विकास कामासाठी कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून न दिल्याबद्दल गावकऱ्यांनी चक्क एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. (Dr bharti pawar news)
वाखारवाडी ( श्रीरामपूर ) ग्रामपंचायतच्या पत्रावरील आशय असा की, सन २०१८ ते १९ लोकसभा निवडणुकीत आपणास आमच्या वाखारवाडी (श्रीरामपुर) गावाने दिंडोरी मतदार संघात विकासाच्या अपेक्षेने भरघोस मतदान केले. परंतु आपण निर्वाचित होऊन चार वर्षापेक्षाही अधिकचा काळ लोटला पण आपण आपल्या वर प्रेम करणाऱ्या गावाकडे सपशेल दुर्लक्ष केले. आपल्या माध्यमातून एकही विकास काम गाव कक्षेत झालेले नाही. महोदया, देवळा तालुक्यातील वाखारवाडी ( श्रीरामपुर) गाव जिथूच आपल्या राजकारणाची सुरुवात झाली. अन गावाची लेक म्हणून गावातील सर्वच मतदारांनी आपल्या पदरात अनमोल मतदान टाकलं होत. आपण आपल्या माहेरकडेच पाठ फिरवली आहे.
लोकसभा निवडणुकीत आमच्या वाखारवाडी गावाने दिंडोरी मतदार संघात प्रथम क्रमांकांचे ९४% टक्के मतदान मायबाप जनतेने आपल्याला दिले होते. त्यावेळी आपण आश्वासनांचा पाऊस पाडला होता. अन गावासाठी मोठ काम व देणगी देण्याचे आश्वासन दिले होते. आपण निवडणूनही आलात अन केंद्रीय मंत्री झालात त्याचा आम्हा गाव वासियांना अभिमान आहे. या अभिमानाची परिणीती गाव विकासात व्हावी हीच अपेक्षा पत्राद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. पत्रकावर सरपंच लिलाबाई पवार ,उपसरपंच प्रश्नांत निकम ,सदस्य जगदीश निकम ,साहेबराव पवार, शोभा पवार ,अर्चना पवार, संगीता पवार, वंदना निकम, वैशाली सावंत, लाला पवार, किशोर सावन्त, सुनील निकम आदींच्या सह्या आहेत .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम