पर्वत रोहणासारखे सहासी खेळ आता राज्यातील तरुण-तरुणींना देखील शिकायला मिळणार आहेत. यासाठी गिर्यारोहण इन्स्टिट्यूट आता स्वतंत्रपणे महाराष्ट्रात देखील लवकरच सुरू होणार असल्याची माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विटर द्वारे दिली आहे.
महाराष्ट्र हे डोंगरदऱ्या, गड, किल्ले, यांचे राज्य आहे. राज्यात अनेक गड, किल्ले असून पर्वत रांगा देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. यामुळे महाराष्ट्रामध्ये पर्यटक आणि गिर्यारोहक यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे.
“महाराष्ट्रात गिर्यारोहण इन्स्टिट्यूट सुरू व्हावी यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे.” असे ट्विट खासदार अमोल कोल्हे यांनी केल आहे.
यावेळी खासदार अमोल कोल्हे म्हणाले की नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग धरतीवर महाराष्ट्र गिर्यारोहक इन्स्टिट्यूट ची निर्मिती व्हावी यासाठी मी गेल्या काही महिन्यांपासून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत होतो महाराष्ट्र हा अनेक थोर महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यामुळे पावन झालेले गड किल्ले हे शिवशंभू भक्तांसाठी आजही ऊर्जा स्त्रोतांचे काम करतात आपल्यातील आजही अनेक जण या गडकिल्ल्यांवर ऊर्जा मिळवण्यासाठी जातात यात महाराष्ट्रात गिर्यारोहकांची संख्या मोठी आहे याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये गिर्यारोहकांसाठी इन्स्टिट्यूट होणं आवश्यक होतं या संदर्भात मी केलेल्या मागणीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांतर्फे मी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे जाहीर आभार मानतो!”
महाराष्ट्रामध्ये पर्वतारोहणांसारखे सहासी खेळ शिकवणारी स्वतंत्र गिर्यारोहण इन्स्टिट्यूट आता सुरू होणार असल्याने याचा खूप मोठा फायदा राज्यातील गिर्यारोहकांना होणार आहे. यामुळे महाराष्ट्र गिर्यारोहण आणि पर्यटनाच्या दृष्टीने देशात पुढील काही वर्षांमध्ये अव्वल स्थानांपैकी एक असेल याची देखील शक्यता नाकारता येत नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम