द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : तुम्ही LPG सिलेंडर वापरत असाल तर ही तुमच्या कामाची बातमी आहे. काही वेळा ग्राहकांना एलपीजी सिलिंडरबाबत पाहिजे तेवढी माहिती मिळत नाही. आता या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी कोणालाही त्रास सहन करावा लागणार नाही. आता क्यूआर कोडद्वारे तुम्ही एलपीजी सिलेंडरशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकता. क्यूआर कोडच्या मदतीने ग्राहक एलपीजी सिलेंडरची सर्व माहिती मिळवू शकतील.
QR कोड असलेले घरगुती LPG गॅस सिलिंडर पुढील 3 महिन्यांत देशभरात उपलब्ध होतील. क्यूआर कोडच्या मदतीने घरगुती एलपीजी ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचणारे एलपीजी सिलिंडर कोणत्या प्लांटमध्ये बाटलीबंद झाले हे सहज कळू शकेल.
इंडियन ऑइलनुसार, प्रत्येक एलपीजी सिलेंडरसाठी क्यूआर कोड आधार कार्डासारखा असेल. यामुळे एलपीजी सिलिंडरची बाटलीबंद करण्यापासून ते वितरणापर्यंतची प्रक्रिया पारदर्शक आणि स्पष्ट होईल. सध्या क्यूआर कोडसह 20 हजार नवीन एलपीजी सिलिंडर जारी करण्यात आले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम