टूथ ब्रश जुना झाल्यावर फेकून देताय का? आता जुन्या झालेल्या ब्रशचा करा असा वापर

0
17

The point now – Swati kadam

काही काळाने आपला टूथब्रश आपण टाकून देतो कारण तो जुना झालेला असतो त्याचा संपूर्ण वापर करून झालेला असतो म्हणून तो आपण डायरेक्ट कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकतो. पण त्या ब्रशचे अनेक काही फायदे आहेत जर तुमचा जुना झाला असेल तर तुम्ही तो फेकून न देता ही काही काम करू शकता तर जाणून घ्या की कोणती आहेत ही कामे जी जुन्या ब्रशचा वापर करून करू शकतो.

घरामध्ये अनेक गोष्टी असतात जे साफ करणे शक्य नसते तसे खिडकीतले केर बाटलीची आतली बाजू अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मोठ्या ब्रशने साफ होत नाहीत यासाठी तुम्ही सर्फ ला ब्रश मध्ये बुडवून आरामात या छोट्या गोष्टी साफ करू शकता.

घरामध्ये अनेकदा आपण केसांना रंगवतो पण जे बेबी हेअर असतात माथ्यावरील छोटी केस ती मोठ्या ब्रशने रंगवता येत नाही तो रंग पूर्ण माथ्यावर पसरू शकतो यासाठी आपण जुन्या ब्रशचा वापर करू शकतो हा ब्रश छोटा असल्यामुळे रंग इकडे तिकडे लागणार नाही.

जुना झालेला ब्रश गरम पाण्यामध्ये थोडावेळ ठेवा त्याच्यामध्ये सर्फ ची पावडर टाका त्याला स्वच्छ करून घ्या त्यानंतर तुम्ही तुमच्या हाताच्या आणि पायांची नखे याने साफ करू शकता म्हणजे घरातल्या घरात पेडिक्युअर करू शकता.

याव्यतिरिक्त आपण लादी पुसताना जिकडे लाद्यांच्या कोपऱ्यात घाण असते ती फडक्यांनी निघत नाही तर या वेळेस तुम्ही या ब्रशचा वापर करू शकता त्यामुळे लादी अधिक चमकेल आणि छोट्या छोट्या भागांमधून कचरा काढण्यास मदत होते.

तुमच्या घरातील काही सोने किंवा इतर धातू असतील तर हे धातू अलगत साफ करण्यासाठी सुद्धा ब्रशचा वापर करू शकता जेणेकरून ते आधीच चमकु शकतात.

जुन्या झालेल्या ब्रश ला फेकून न देता ही सर्वे कामे तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात करू शकता अशाच काही उपयुक्त टिप्स साठी वाचत राहा the point now


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here