Divyang nidhi : देवळा नगरपंचायतीच्या वतीने दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के सेस निधींतून आर्थिक लाभ देण्यात आला. अशी माहिती नगराध्यक्षा सुलभा आहेर यांनी दिली . नगरपंचायतीच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी दरवर्षी पाच टक्के सेस निधीची तरतूद करण्यात येते. (Divyang nidhi )
या निधीतून पहिल्या टप्प्यात तीस अपंग लाभार्थ्यांना तर आज दुसऱ्या टप्प्यातील बेचाळीस लाभार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये प्रमाणे निधीचे वितरण करण्यात आले . यावेळी संबंधित दिव्यांग बांधवानी समाधान व्यक्त केले. देवळा शहरातील अपंग लाभार्थ्यांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा ,असे आवाहन नगराध्यक्षा सुलभा आहेर,उप नगराध्यक्ष अशोक आहेर यांनी केले. (Divyang nidhi )
Deola Nagar Panchayat: देवळा नगरपंचायतीच्या वतीने रमाई घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना पत्र वाटप
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर ,अतुल पवार , नगरसेवक मनोज आहेर , मुख्याधिकारी शामकांत जाधव , कर्मचारी सुधाकर आहेर , शरद पाटील , दीपक सूर्यवंशी आदींसह लाभार्थी उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम