पचनक्रिया चांगली राहण्यासाठी हे आयुर्वेदिक उपाय करा…

0
42

पचनक्रिया आपल्या शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. पचनक्रियेमुळे आपण खाल्लेले अन्न पचन होते आणि आपल्या शरीरात ऊर्जा प्राप्त होते.

पण हल्लीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना सतत वेगवेगळया कारणांनी पचनाची समस्या भेडसावते. जेवणाची वेळ चुकणे, जास्त गोड खाणे, मद्यसेवन यामुळे आपली पचनक्रिया बिघडते. जर तुम्ही हे आयुर्वेदिक उपाय केल्यास तुमची पचनक्रिया चांगली राहील आणि तुमच्या आरोग्याला फायदा होईल.

१) योग्य पध्दतीने आणि एकाग्र होऊन आहार सेवन

सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच एकापेक्षा जास्त काम करण्याबाबत विचार करायचे असते, इथूनच खरी समस्या उद्भवते. आयुर्वेदात नेहमी एकाग्र होऊन आहार घेण्याचा सल्ला दिला आहे. कारण असे केल्याने मेंदूला आपण घेत असलेल्या आहाराबाबत योग्य माहिती मिळते.

२) अग्नी विझवणारे पदार्थ टाळा

तेलकट, थंड पदार्थ तुमच्या पोटातील पचनक्रियेसाठी आवश्यक अग्नी विझवते. अधिक प्रमाणात कोल्डड्रिंक्सचे सेवन केल्यास पोटातील पचनक्रिया बिघडते. क्षमतेपेक्षा जास्त खाणे व अति झोप यानेही पोटातील अग्नीचे अस्तित्व धोक्यात येते.

३) अग्नीची सुधारणा

तुम्ही तुमच्या पोटातील अग्नी सुधारू शकता, जेणेकरुन याचे तुम्हाला चांगले परिणाम दिसतील. जेवणाआधी थोडे चालल्याने तुमच्या आरोग्यास  फायदा होऊ शकतो. सकाळी उठल्यावर २ ग्लास पाणी प्यायल्यास तुमची पचनक्रिया चांगली राहते.

४) पौष्टिक आहार

ज्या पदार्थांमधून तुम्हाला पोषक तत्व मिळतील, असे पदार्थ दिवसभरात खाल्ले पाहिजे, याने पचनक्रियेतील अग्नीची सुधारणा होते. तसेच हलके व पौष्टिक पदार्थांचे सेवन हे पोटातील अग्नीची ऊर्जा वाढवते. यासाठी तुमच्या आहारात जास्तीत जास्त भाज्या आणि फळे असणे तुमच्या पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे.

५) जेवणाची वेळ ठरवा

ही सवय लावायला थोडी कठीण आहे, पण तुम्हाला याचा खूप फायदा होऊ शकतो. रोज एकाच वेळेवर जेवण करणे तुमच्या पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे जेणेकरून तुमचं आरोग्य चांगले राहते.

६) ताजी हवा आणि काही योगाभ्यास

जशी आग पेटवण्यासाठी अग्नीची गरज असते, तशीच पचनक्रियेतील अग्नी कायम ठेवण्यासाठी ताज्या हवेची गरज असते. सकाळी फिरायला जाणे किंवा निसर्गाच्या सानिध्यात फिरल्याने तुम्हाला चांगली हवा मिळू शकेल.

७) योग्य प्रमाणात पाणी पिणे

रोज योग्य प्रमाणात पाणी पिणे तुमच्या पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे. पाण्याने केवळ पचनतंत्रातील बॅक्टेरिया संतुलित राहतात असे नाही तर याने आहारातून मिळालेले पोषण तत्व शरीरात पोहोचवण्यासही मदत होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here