धुळे – जिल्ह्यातील साक्री तालुक्यात दौऱ्यावर आलेले शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंत्री भुसे यांना काळे झेंडे दाखवत शेतकऱ्यांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
बंदरे व खनिकर्म मंत्री असलेले दादा भुसे आज धुळे दौऱ्यावर होते. यावेळी ते साक्री तालुक्यातील कासारे येथे विविध कामांच्या भूमिपूजनासाठी जात असताना उपस्थित शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून भुसेंचा निषेध केला. विशेष म्हणजे, मंत्री भुसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता शेतकऱ्यांनी मंत्र्यांना डावलत कांदा प्रश्नांकडे गांभीर्याने बघण्याचे सुचविले.
कांद्याला भाव मिळत नाही, साक्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी हे आक्रमक आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी थेट मंत्र्यांसमोर ‘५० खोके, मंत्री ओके’ अशा जोरदार घोषणा दिल्या. उपस्थित पोलिसांनी आंदोलकांना बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडत दादा भुसे यांना दखल घेण्यास भाग पाडले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम