देवपूरपाडे माऊली विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

0
196

देवळा ; देवपूरपाडे येथील ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियाना अंतर्गत 15 ऑगस्ट रोजी डी.जे. लेझीम, टिपरी, वाद्याने गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरीमध्ये देशभक्तीपर गीत व स्वातंत्र्याचा जयजयकार करण्यात आला.

देवपूरपाडे येथील ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष अभिमन अहिरे,सरपंच अनिता सोनवणे व विद्यार्थी, शिक्षक आदी (छाया – सोमनाथ जगताप)

76 व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण मार्च 2022 मध्ये झालेल्या शालांत परीक्षेत प्रथम आलेल्या कु. काजल आढाव , कु. कोमल आढाव या विद्यार्थ्यांनीच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पं स चे माजी सभापती सुखदेव अहिरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी समर्थ रामदास महाराज शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व देवराम सदा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अभिमन अहिरे हे होते.

यावेळी सरपंच अनिता सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य अजय अहिरे, ज्योती अहिरे ,सविता अहिरे अनिता जोंधळे, मनीषा कुवर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष अभिमन अहिरे यांच्या हस्ते इयत्ता दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना 1100 रुपये ,द्वितीय क्रमांक 501, तृतीय क्रमांक 101, व उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना प्रत्येकी 101 रुपये बक्षीस देण्यात आले. तसेच प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थितींपैकी भागा आढाव यांचेकडून 2100 रुपये व सुखदेव अहिरे 501 रुपये व सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजाराम पवार यांचे कडून 501 रुपये बक्षीस रोख स्वरूपात देण्यात आले.

अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी दीक्षा अहिरे ,कु. योगिता अहिरे ,कु रोशन तलवारे ,कु यज्ञेश साळुंखे, स्नेहा सोनवणे, जागृती देवरे किरण अहिरे, ऋतुजा ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले . स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक जे. यू. वाघ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती सोनवणे , श्रीमती. जोंधळे,सोनवणे एम.एन, व्ही.टी. देवरे बी .पी , एम.एस ,अहिरे, पी.पी , कदम ,बिरारी बि.के ठाकरे एम. ए. आढाव, बी.टी. यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन पि.डी सूर्यवंशी यांनी केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here