देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमाची तपपुर्ती

0
17

नाशिक प्रतिनिधी : राज्यात गणेश विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली होती. अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. नाशिक शहरात गेल्या 12 वर्षापासून देव द्या, देवपण घ्या हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सुमारे ३ हजार पेक्षा जास्त मुर्ती व निर्माल्य संकलित करण्यात आले आहे.

सलग १२ व्या वर्षीच्या देव द्या, देवपण घ्या उपक्रम आकाश पगार यांच्या नेतृत्वाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला

गणेश विसर्जनाच्या निमित्ताने चोपडा लाँन्सजवळील गोदापार्क येथे सकाळी ९ वाजेपासून “देव द्या देवपण घ्या” या उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित होते. गणेशभक्तांना आरती करण्याची व्यवस्था देखील यावेळी उपलब्ध करुन देण्यात आली होती. या उपक्रमास लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे सहकार्य लाभले.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधने व निर्माल्यामुळे गोदावरीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्यामुळे गेल्या १२ वर्षांपासून विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातुन अध्यक्ष आकाश पगार यांच्या नेतृत्वाने “देव द्या, देवपण घ्या” हा उपक्रम राबविण्यात येतो. गणेशोत्सवातील १० दिवस जनजागृती करणारे पत्रके घराघरात वाटली होती. तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून देखील प्रभावी प्रचार तसेच आवाहन करण्यात आले होते.

नाशिकच्या गोदाप्रेमी भाविकांनी या आवाहनाला भरभरून पाठिंबा दिला. दिड, पाच व सात दिवसांच्या घरगुती गणेशोत्सवातील मूर्ती देखील स्वीकारण्यात आल्या होत्या.
विसर्जनाच्या दिवशी सकाळी ९ वाजेपासूनच या उपक्रमाचे कार्यकर्ते चोपडा लाँन्सजवळील गोदापार्कच्या प्रवेशद्वाराजवळ खास तयार करण्यात आलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन करीत होते. निळ्या रंगाचे टि-शर्ट व हातमोजे घातलेले हे कार्यकर्ते नाशिककरांचे लक्ष वेधून घेत होते.

यावेळी लहानग्यांपासून ते वयोवृद्ध नागरिक मोठया संख्येने गणेश मूर्ती दान करत होते. या मुर्तींची पुजा व आरती करुन अत्यंत भावपूर्ण वातावरणात महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येत होत्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश पगार, प्रकाश चितोडकर, विशाल गांगुर्डे, वैष्णवी जोशी, राहुल मकवाना, रोहिणी सोनवणे, मोनाली गवे, जयंत सोनवणे, संकेत निमसे, जयश्री नंदवानी, तुषार गायकवाड, सोनिया पगार, भाग्यश्री जाधव, रोहित कळमकर, कोमल कुरकुरे, भावेश पवार, शुभम पगार, दुर्गा गुप्ता, अतुल वारुंगसे, गौरी घाटोळ, हर्षिता माळी, प्रणाली शिंदे, सोनू जाधव, स्मिता शिंदे, कनिष्का माळी, ललित पिंगळे, अविनाश बरबडे, अमोल पाटील, मयूर पवार, वैभव बारहाते, सागर दरेकर, सिद्धेश दराडे, महेश मंडाले, कुणाल सानप, प्रसाद हिरे, मदन म्हैसधुणे, योगेश निमसे, हरी चौधरी, निलेश मोरे, देवा गायकवाड, भगवान भोगे, सागर बच्छाव, अमोल शेळखे, अमोल गायकवाड, चेतन गांगोडे, विशाल वानखेडे, बंटी भोळे, गोरख महाले, तुषार इप्पर, रोहन जाधव, दर्शन पवार, धनराज रौंदळ, मयुर सावंत, प्रथमेश देवरे, दत्तु जगताप, नितीन पाटणकर आदींनी परिश्रम घेतले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here