राष्ट्रवादीला मोठा झटका;देशमुख, मलिकांची याचिका कोर्टाने फेटाळली

0
13

द पॉईंट नाऊ ब्युरो : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil deshmukh) आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे दोन्ही नेते सध्या तुंरुगात आहेत. राज्यसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांना मतदान(Voting) करण्यासाठी न्यायालयाने परवानगी नाकारली होती. त्यानंतर आज 20 जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणूक मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी मतदान करता यावे यासाठी या दोघांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर काल कामकाज होऊन न्यायालयाने आज निर्णय देत दोघांची याचिका फेटाळली आहे.

दोन्ही नेते तुरुंगात असल्यामुळे राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसला होता. तसेच मविआला दोन मतं गमवावी लागली होती. या दोन नेत्यांना राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदानाची परवानगी दिली नव्हती, किमात आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदानाची परवानगी द्यावी अशी मागणी करणारी याचिका मलिक व देशमुख यांनी दाखल केली होती. आज मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) या दोन्ही नेत्यांचे अर्ज फेटाळला असून, दोघांना मतदान करण्यास परवानगीला नकार दिला आहे. दरम्यान, मतदान करता येणार नाही असं कोर्टानं म्हटलं आहे.

मविआ पुढे अडचणीत वाढ..

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे मलिक व देशमुख या दोन नेत्यांना न्यायालयाने झटका दिला आहे. त्यामुळं राष्ट्रवादी व मविआ समोरील अडचणी सुद्धा वाढल्या आहेत. त्यामुळे आता अपक्ष आमदारांचे मत मिळविण्यासाठी अधिक जोर लावावा लागणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here