देवळा : आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप गट व गण रचना जाहीर करण्यात आली असून , देवळा तालुक्यात तीन गट व सहा गण आहेत . यात पूर्वीच्या वाखारी गटाची रचना खर्डे (वा )अशी करण्यात आली तर लोहोनेर गटातील महाल पाटणे गणाची रचना खालप अशी करण्यात असून , उमराणे गटात असलेले खडकतळे गांव लोहोणेर गटात समाविष्ट करण्यात आले आहे .
गट व गण निहाय गांवे पुढील प्रमाणे ;
लोहोनेर गट १) लोहोनेर गण (निर्वाचन गणाचा क्रमांक ३५) समाविष्ट गावे – लोहोनेर ,विठेवाडी , झिरेपिंपळ , भऊर ,सावकी ,खामखेडा ,
२)३६ खालप गण समाविष्ट गावे – महालपाटणे ,देवपूरपाडे , डोंगरगाव ,खालप ,निंबोळा , वासोळ ,फुलेनगर ,खडकतळे
उमराणे गट ३) उमराणे गण ३७ समाविष्ट गावे – उमराणे ,तिसगाव ,गिरणारे ,कुंभार्डे ,सांगवी ,वर्हाळे ,म. फुलेनगर ४) मेशी गण ३८ समाविष्ट गावे – दहिवड, रामनगर ,पिंपळगाव (वा ) , चिंचवे (नि ) ,मेशी ,श्रीरामपूर ,
खर्डे (वा ) गट ५) वाखारी गण ३९ – समाविष्ट गावे – वाखारी , भिलवाडा , गुंजाळनगर , रामेश्वर , खुंटेवाडी , कापशी , भावडे , सुभाष नगर ,फुले माळवाडी ,विजय नगर ,
६)खर्डे गण ४० समाविष्ट गावे – खर्डे ,वाजगाव ,वडाळे , सटवाईवाडी , मटाने , कनकापूर , कांचने , वार्शी , हनुमंतपाडा , वरवंडी , माळवाडी , शेरी याप्रमाणे प्रशासनाने गट , गणांची प्रारूप रचना तयार केली असून, हरकती नंतर रचना निश्चित होऊन आरक्षण सोडत निघणार आहे .
यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी पहावयास मिळणार आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम