
देवळा : देवळा तालुक्यात ग्रामसेवक युनियनच्या तालुका अध्यक्ष पदी ग्रामसेवक पतसंस्थेचे संचालक व खर्डे येथील ग्रामविकास अधिकारी योगेश पगार यांची फेर निवड करण्यात आली आहे. सण २०२२ते २०२७ या कालावधीसाठी नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियन अंतर्गत देवळा तालुका ग्रामसेवक युनियनची कार्यकारणी निवडीबाबत आज गुरुवारी , दि. २९ रोजी पंचायत समितीच्या सभागृहात विस्तार अधिकारी जयवंत भामरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नवीन कार्यकरणीची निवड करण्यात आली . कार्यकारीणीमध्ये सचिवपदी संभाजी देवरे , सहसचिव – जयश्री आहेर , उपाध्यक्ष पदी -रामकृष्ण अहिरराव , जयश्री निकम , संघटक- सरिता मिस्तरी , नंदू सोनवणे , सल्लगार – जिभाऊ देवरे , लेखापरीक्षक -अनिल आहेर यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी राजश्री देसले , पूनम सोनजे , निंबा सूर्यवंशी , अरुण आहेर, विजय सोळसे , यू बी खैरणार, जगन्नाथ शिंदे , श्रीमती सोनार ,वैशाली येळीज आदींसह युनियनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम