देवळा तालुक्यात “परीक्षेवर चर्चा “कार्यक्रमाला उस्त्फुर्त प्रतिसाद

0
34
देवळा महाविद्यालयात परीक्षेवर चर्चा स्पर्धेत सहभागी विध्यार्थ्यांना प्रमाण पत्र देताना गटनेते संभाजी आहेर , भाजयुमोचे तालुका अध्यक्ष योगेश ( नानू ) आहेर, माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा ; येथे आमदार डॉ राहुल आहेर , जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ” परीक्षेवर चर्चा ” कार्यक्रमांतर्गत संपूर्ण देवळा तालुक्यातील शाळांमध्ये बुधवारी (दि २५ ) रोजी चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .

देवळा महाविद्यालयात परीक्षेवर चर्चा स्पर्धेत सहभागी विध्यार्थ्यांना प्रमाण पत्र देताना गटनेते संभाजी आहेर , भाजयुमोचे तालुका अध्यक्ष योगेश ( नानू ) आहेर, माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

या कार्यक्रमाला उस्त्फुर्त प्रतिसाद मिळाला असून ,जवळपास अडीच हजार विध्यार्थ्यानी यात आपला सहभाग नोंदवला . तालुक्यातील देवपूरपाडे , निंबोळा , खर्डे , वाखारी , पिंपळगाव (वा ) , देवळा , दहिवड , खुंटेवाडी , जि प विद्यानिकेतन देवळा येथील विद्यालयात चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी ,कार्यकर्ते ,शिक्षक यांनी उपस्थित राहून स्पर्धा यशस्वी पार पडल्या .यात सर्व सहभागी विध्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .

पंतप्रधान. नरेंद्र मोदी यांनी सन 2018 पासून परिक्षेपूर्वी “परिक्षेवर चर्चा :कार्यक्रमांतर्गत विद्याथ्र्यांशी संवाद साधून त्यांच्यावरील परिक्षेचा ताण दूर करण्यासाठी आपले अनुभव व तणाव दूर करण्याचे मार्ग सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करीत आहेत . हा एक अतिशय उपयुक्त असा कार्यक्रम आहे. पतप्रधानांनी याबाबत सांगितले की , विदयाथ्र्यांनी परीक्षेच्या काळात तणावमुक्त राहावे , कॉपी करण्याची गरज नसून तुम्ही जे काही कराल ते आत्मविश्वासाने करत रहा , नरेंद्र मोदी हे 27 जानेवारी रोजी सकाळी 11.00 वाजता परिक्षेवर चर्चा कार्यक्रमात विदयार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

स्पर्धेच्या प्रथम , द्वीतीय व तृतीय पुरस्कार विजेत्याची घोषणा करण्यात येऊन त्यांना प्रमाणपत्रा ‘ बरोबरच स्मृति चिन्ह व तसेच 10 उत्कृष्ट व 25 उतेजनार्थ स्पर्धकांना कला पुरस्कार देऊन त्यांना लवकरच सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती भाजयुमोचे तालुका अध्यक्ष योगेश ( नानू ) आहेर , भाजपचे तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी दिली . यावेळी शहर अध्यक्ष अतुल पवार, तुषार आहेर, सार्थक आहेर,सुहानी आहेर ,प्राची आहेर आदींसह भाजपा युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here