
देवळा ; एच. ए .एल .कॉलेज ओझर टाऊनशिप येथे झालेल्या अंतर महाविद्यालयीन जुदो मुले व मुली स्पर्धेत नाशिक विभागाच्या संघात विविध वजन गटात मुलांच्या संघात देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाचे श्रीमती उदयकांत व कार्तिक भामरे तर नाशिक विभागाच्या मुलींच्या संघात कु. पूजा अहिरे ,पौर्णिमा सावंत व ज्योत्सना परदेशी यांची निवड करण्यात आली.

दि 23 व 24 नोव्हेंबर रोजी केटीएचएम कॉलेज मध्ये होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली . खेळाडूंचे प्रशासकीय अधिकारी डॉ मालती आहेर, प्राचार्य हितेंद्र आहेर आदींसह प्राध्यापकांनी अभिनंदन केले ,व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम