देवळा : एस.के.डी. चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक संचलित तालुक्यातील भावडे येथील एस.के.डी. स्कूल मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आनंदात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एस.एन. पाटील होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मराठी भाषेवर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. मराठी भाषेवर आधारित भित्तिपत्रिका लावून वर्ग सजविण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात भारुड, कविता, नृत्य, कोळीगीत, देशभक्तीपर गीते, पोवाडा ,एकांकिका चिमुकल्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सादर केल्या. कार्यक्रमासाठी मराठी विभागाकडून विद्यालयाच्या शिक्षिका पूनम सावंत, सारिका देवरे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षिका अर्चना महाजन, रजनी आहेर संगीत शिक्षक रतन भोईर यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला मराठी विभागाचे सखोल मार्गदर्शन लाभले. बबलू देवरे, सागर कैलास यांनी कामी विशेष परिश्रम घेतले . याप्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय देवरे ,सचिव मीना देवरे ,प्राचार्य एस.एन. पाटील , एन.के वाघ ,सुधीर सोनवणे ,पर्यवेक्षक पवार एस.जे.पवार आदींसह विध्यार्थी उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम