संजय राऊत यांच्या सुटकेने देवळा शिवसेनेचा जल्लोष तर भाजपा विरोधात घोषणाबाजी

0
36
देवळा - येथे खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने देवळा पाचकंदीकलावर करण्यात आलेली फटाक्यांची आतषबाजी व उपस्थित पदाधिकारी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा : येथील शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने तालुक्यात जल्लोष करण्यात आला. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख देवानंद वाघ, उपजिल्हा संघटक नंदु जाधव ,तालुकाप्रमुख बापु जाधव, शहर प्रमुख विश्वनाथ गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली देवळा पाच कंदिलवर शिव सैनिकांच्या वतीने भाजपा सरकारच्या विरुद्ध घोषणा देत फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात आनंद साजरा करण्यात आला .

देवळा – येथे खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने देवळा पाचकंदीकलावर करण्यात आलेली फटाक्यांची आतषबाजी व उपस्थित पदाधिकारी ( छाया -सोमनाथ जगताप )

यावेळी तालूका संघटक प्रशांत शेवाळे, उपतालुकाप्रमुख प्रमुख विलास शिंदे, वसंत सुर्यवंशी, माजी .उपतालूका प्रमुख विजय जगताप, उपतालुका संघटक भास्कर अहिरे, विजय आहेर, विभाग प्रमुख गोरख गांगुर्डे, शहर संघटक देवा चव्हाण, ऊपशहरप्रमुख जितेंद्र भामरे, सोमनाथ शिंदे, समाधान शिंदे, खंडू जाधव, भाऊसाहेब आहेर, सतिश आहेर, कैलास चव्हाण, अविनाश देवरे, योगेश आहेर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here