
देवळा : छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत.आधुनिक युगातील डाॕ. नितीन गडकरी हे आदर्श आहेतअसे वादग्रस्त व अवमानास्पद वक्तव्य करत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची पुन्हा जीभ घसरवली आहे .

छत्रपती हे काल, आज आणि उद्याही कायमच आमचे आदर्श राहातील. हे कोश्यारीना माहिती नाही . त्यांच्या या अवमानस्पद वक्तव्याचा देवळा येथे आज सोमवारी (२१ ) रोजी शिवसेनेचे ( उद्धव ठाकरे गट ) उपजिल्हाप्रमुख देवा वाघ, तालुकाप्रमुख बापु जाधव, शहरप्रमुख विश्वनाथ गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली शिवस्मारक परीसरात जाहीर निषेध व्यक्त करण्यात येऊन जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकार्यांनी कोश्यारीच्या प्रतिमेला जोडे मारुन घोषणा दिल्या. शिवसैनिकांच्या घोषणांनी परीसर दणाणुन गेला होता. आंदोलना नंतर सहायक पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम सिरसाठ यांना निवेदन देत जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
याप्रसंगी उपजिल्हा संघटक नंदू जाधव, तालुका संघटक प्रशांत शेवाळे,माजी उपतालुका प्रमुख विजय जगताप, उपतालुकाप्रमुख विलास शिंदे, उपतातालूका संघटक विजय आहेर, विभाग प्रमुख गोरख गांगुर्डे, शहर संघटक देवा चव्हाण, उपशहरप्रमुख जितेंद्र भामरे, खंडू जाधव, समाधान शिंदे, सोमनाथ शिंदे, सतिश आहेर, भाऊसाहेब आहेर, योगेश आहेर, दत्तू मोरे ,पवन देवरे,गोरख विश्वास, गोविंदा सोनवणे, ज्ञानेश्वर देवरे, उपेंद्र आहेर, बळीराम वाघ, गटप्रमुख सुनिल निकम, गणप्रमुख शरद बच्छाव आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम