देवळा | सोमनाथ जगताप
देवळा शहरासह तालुक्यात रविवार (दि.१९) रोजी शिवजयंती विविध कार्यक्रम घेत मोठ्या उत्साहात साजरी झाली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या संकल्पनेतून येथील शिवस्मारकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आल्याने येथे शिवप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला.

(छाया – देवा भामरे )
प्रत्येक गावात शाळा, विद्यालये, विविध संस्था, मंडळे,ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे व प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. भगवे झेंडे, भगवे शर्ट, भगवे फेटे यामुळे जिकडेतिकडे भगवेमय वातावरण दिसून आले. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे, गाणी ,मिरवणूक व विविध कार्यक्रमातून शिवप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहत होता.
White Foam In The River: कधीकधी नद्यांमध्ये पांढरा फेस का दिसतो? या आहेत भारतातील सर्वात घाण नद्या
देवळा येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव अपूर्व उत्साहात साजरा झाला. ढोलताशांचा गजर, आदिवासी नृत्य , पालखी मिरवणूक, विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, छत्रपती शिवरायांची आरती असे अनेक विविधांगी कार्यक्रम दिवसभर साजरे झाले. भगवे फेटे, भगवे झेंडे, भगव्या पताका यामुळे शिवस्मारकाचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. भगव्या साड्या, भगवे फेटे परिधान केलेल्या महिलावर्गाचा सहभाग या कार्यक्रमाचे वेगळेपण होते.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, शिक्षक ,सामाजिक कार्यकर्त्यांचा जिल्हाध्यक्ष केदा आहेर ,माजी नगराध्यक्षा धनश्री आहेर, नगराध्यक्षा सुलभा आहेर, अशोक आहेर,संभाजी आहेर, जितेंद्र आहेर, अतुल पवार, पंकज आहेर आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.उपस्थित प्रेक्षकांना लेझरशोद्वारे शिवस्मारकाची उभारणी, कामाची माहिती दाखविण्यात आली . या कार्यक्रमास तालुका भरातून ग्रामस्थांनी हजेरी लावली .
एसकेडी इंटरनॅशनल स्कुल, कदम क्लासेस, कसमादे परीसर विकास मंडळाच्या डाॅ.डी.एस. आहेर स्कुल व डॉ. दाैलतराव आहेर अनुदानित आश्रमशाळा येथील विद्यार्थ्यांनी विविध कलागुण व नृत्य सादर करत देवळावासीयांची मने जिंकली. येथील डॉ.सतीश वाघ यांच्यासह इतरांनी केलेल्या वेशभुषांनी सगळ्यांचे लक्ष वेधले. यावेळी झालेल्या मुख्य कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले. शिवस्मारक परिसरात मोठया प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान आहेर ,व पूनम आहेर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी संयोजन केले. रात्री उशिरापर्यंत शिवप्रेमींचा जल्लोष दिसून आला . संपूर्ण तालुक्यात जयंती उत्सव सोहळा शांततेत पार पडला. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
“देवळा शहर व तालुक्यातील शिवप्रेमींनी या लोकोत्सवाला दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व असा होता. इतक्या मोठ्या स्वरूपात पहिल्यांदाच असा भव्य कार्यक्रम झाला.”
– मुन्ना आहेर अध्यक्ष, देवळा सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम