देवळा : देवळा येथे उद्या शिवजयंती निमित्ताने शिवस्मारकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर सायंकाळी ४ वाजता भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष पंकज मुन्ना आहेर यांनी दिली.
आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का ? – आंबेडकर
देवळा येथील शिवस्मारकात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लक्षवेधी ठरला आहे. याठिकाणी दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. याही वर्षी मोठ्या जल्लोष शिवजयंती साजरी करण्यात येणार असून, याची जय्यत तयारी झाली आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. जयंती उत्सव समितीच्या वतीने शिवस्मारक परिसर विद्युत रोषणाई सह भगवा मय करण्यात आला आहे. याकामी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पंकज (मुन्ना) आहेर आदींसह कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत. शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार असल्यामुळे शिवप्रेमींमध्ये अभूतपूर्व जल्लोष अन् उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच हेलिकॉप्टरने होणारी पुष्पवृष्टी यावेळी प्रमुख आकर्षण ठरणार आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम