
देवळा : येथे शिवजयंती उत्सव समितीची बैठक भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि२६) रोजी पार पडली. बैठकीत यावर्षीच्या शिवजयंती उत्सव समितीची नवीन कार्यकारणी निवडण्यात आली .

यात अध्यक्ष पदी पंकज (मुन्ना)आहेर,उपाध्यक्ष पदी रजत दिलीप आहेर,धनंजय अनिल आहेर, तर खजिनदार पदी नितीन (बाबाजी ) निकम यांची निवड करण्यात आली. तर ,सदस्यपदी नाना चंदन ,हितेश आहेर,शुभम मेतकर, सुभाष देवरे,लक्ष्मीकांत आहेर, मयूर आहेर,नाजीम तांबोळी, अनिल आहेर,दावल आहेर, सुरज अलिटकर, तन्वीर मणियार,तुषार आहेर,रोशन आहेर,मयूर भैया आहेर,भूषण आहेर, तुषार मुन्ना आहेर, अतुल आहेर, राकेश आहेर,शुभम आहेर,विजय आहेर,राजेश आहेर, प्रदीप पवार ,शांताराम आहेर, संदीप आहेर, किरण आहेर, नईम पठाण आदींची निवड करण्यात आली.
बैठकीत येत्या १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती साजरी करण्यासंदर्भात रूपरेषा ठरविण्यात येऊन, यावेळीजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली. समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर ,भाऊसाहेब पगार ,जितेंद्र आहेर ,अतुल पवार ,नानू आहेर आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम