सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | लोहोणेर गावानजीक गिरणा नदी पात्रातून संबंधित अधिकाऱ्यांच्या मेहरबानीमुळे मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी सुरू असून रोज रात्री उशिरापर्यंत हजारो ब्रास वाळू उपसा होत आहे. या वाळू तस्करीकडे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने वाळू तस्करीत मोठी माया जमा होत असून, स्थानिक वाळू तस्करासह बाहेर गावाहून या ठिकाणी वाळू तस्कर येतात. या ठिकाणी अवैध वाळू उपसा जोरदार सुरू असून ही वाळू तस्करी कोणाच्या मेहरबानी खाली सुरू आहे..? असा सवाल लोहोणेर येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिपक बच्छाव व ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
लोहोणेर येथील अवैध वाळू चोरीला सध्या चांगलाच उत आला असून दिवसेंदिवस वाळू तस्कराच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. दररोज वाळू बिनबोभाट उचलली जात असून यामुळे एकीकडे लाखो रुपयांचा महसूल बुडतो आहे. या अवैध वाळू उपसाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात आहे आणि अधिकाऱ्यांच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे वाळू तस्कराची संख्या वाढली असून सकाळी उशिरापर्यंत गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरूच असतो. रात्रीच्या अंधारात टॅक्टरच्या सह्याय्याने वाळू उपसा केला जातो. यामुळे गिरणा नदी पात्रात असलेल्या सर्व पाणी योजना धोक्यात आल्या असून पाण्याची पातळीदेखील खालावली आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणावर जल संकट या वाळू उपसामुळे निर्माण होणार असून यास संबंधित अधिकारीच जबाबदार आहेत, असा स्पष्ट आरोप माजी सरपंच दिपक बच्छाव यांनी केला आहे.
Deola | नैसर्गिक आवळ्या नाला वहिवाटीसाठी खुला; उपोषणकर्ते शेतकरी कुटुंबांना दिलासा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम