श्री रामराव आहेर पतसंस्थेच्या १३ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात

0
38

देवळा | सोमनाथ जगताप
देवळा येथील सहकारातील अग्रगण्य अशा श्री रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता १३ जागांसाठी २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत.

या संस्थेच्या १३ जागांसाठी ४३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. आज माघारीच्या अंतिम दिवशी १४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांना उद्या चिन्ह वाटप करण्यात येणार आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांनी दिली.

जागा निहाय उमेदवार पुढीलप्रमाणे

सर्व साधारण गट– पवन अहिरराव ,चंद्रकांत अहिरराव ,अविनाश आहेर ,चिंतामण आहेर , दुलाजी आहेर ,भाऊसाहेब आहेर, रजत आहेर, वसंतराव आहेर , विजय आहेर, सुभाष आहेर , अरुण खरोटे , दत्तात्रेय देवरे , शिवाजी पाटील, जयवंत भदाणे , सतिश राणे , विनोद शिंदे , संतोष शिंदे , नितीन शेवाळकर ,

पवन अहिरराव , पंकज आहेर – इतर मागासवर्गीय गट

रमेश गुजरे , विठठल गुजरे , गोविंदा सोनवणे –अनुसूचित जाती जमाती गट

दिप्ती आहेर ,मेघा आहेर ,लताबाई आहेर , वंदना आहेर – महिला राखीव गट

चंदण पंडित बिरु , चंदन प्रभाकर कारभारी भटक्या विमुक्त जाती गट याप्रमाणे आहेत.

एकूण मतदार सभासद १६०० असून, मतदान ८ जानेवारी रोजी होणार आहे. देवळ्यात इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका नुकत्याच बिनविरोध झाल्या असून, रामराम आहेर पतसंस्थेची निवडणूक देखील बिनविरोध होईल अशी अपेक्षा असतांना माघारीच्या दिवशी एकमत होऊ न शकल्याने अखेर निवडणूक लादली आहे. यामुळे सभासदांना एकदा रणधुमाळी पहावयास मिळणार आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here