देवळा: देवळा तालुक्यातील गिरणा नदी पात्रावरील विठेवाडी व सावकी या दोन गावात राज्य शासनाने कोल्हापूर टाईप बंधाऱ्यासाठी मंजुरी दिल्याने गेल्या अनेक वर्षापासुनच्या प्रलंबित असा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी जल्लोष करून आमदार डॉ.राहुल आहेर यांचा आज गुरुवारी दि २९ रोजी विठेवाडीत जाहीर सत्कार करून आभार व्यक्त केले.
गिरणा नदी पात्रावर गेली ४० ते ४५ वर्षापासून केटी वेअर बंधाराची मागणी केली जात होती. परंतु नदी पात्र मोठे असल्याने यावर अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. यासाठी शासनाची परवानगी चणकापूर धरणावर कळवण पासून ते मालेगाव पर्यंतची गावे पिण्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत त्यामुळे नदी पात्र अधिसूचित असल्याने यावर नवीन बंधारे बांधणे व पाणी अडवणे यावर मनाई होती. मात्र यावर आमदार डॉ. राहुल आहेर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे लागून सदरची बाब मंजूर करून घेतली व यामुळे गिरणा नदी पात्रावरील सावकी, विठेवाडी, खामखेडा या गावातील शेती पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण दिसून आले. कामाला मंजुरी मिळतात येथे फटाक्यांची आतषबाजी करून डॉ. राहुल आहेर यांचे जल्लोष स्वागत करून आभार मानले.
यासाठी शासनाने विठेवाडी येथील बंधाऱ्यास १७ कोटी रुपये तर सावकी येथील बंधाऱ्यास २० कोटी रुपये मंजूर केले असून सावकी येथील बंधाऱ्याची लांबी १५० मीटर आहे तर विठेवाडी येथील बंधाऱ्याची लांबी १२५ मीटर आहे. दोघाही बंधाऱ्यावर ४३ गेट उभारण्यात येणार आहेत.
यावेळी उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे , देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभिमन पवार, माजी संचालक पंडिराव निकम , विठेवाडी येथील बाबुराव पाटील, विलास निकम, माजी सरपंच कारभारी पवार, श्रावण बोरसे ,खामखेडा सरपंच वैभव पवार ,शशिकांत निकम, राजेंद्र निकम, कुबेर जाधव, महेंद्र निकम, आदींसह आजूबाजूच्या गावातील सरपंच , ग्रामपंचायत सदस्य ,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम