सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना देवळाच्या वतीने विविध मागण्यांसाठी 10 जुलैपासून देवळा तहसील येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्या संदर्भात शासन स्तरावरून कोणतेही सकारात्मक कार्यवाही होत नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर महसूल कर्मचारी संघटनेचे दिनांक 10 जुलै ते 15 जुलैपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने निषेध करून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. संघटनेने ठरवून दिलेल्या आंदोलनाच्या दिशेनुसार देवळा येथील महसूल कर्मचाऱ्यांनी दिनांक 10 जुलै रोजी काळ्या फीती लावून काम केले.
Deola | देवळा रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी राकेश शिंदे तर सचिवपदी डॉ. सुनिल आहेर यांची निवड
तर दिनांक 11 रोजी जेवणाच्या सुट्टीमध्ये कार्यालयाच्या गेटवर निदर्शने केली. शुक्रवार दिनांक 12 जुलै रोजी ‘लेखनी बंद’ आंदोलन करण्यात येणार असून व मागण्या मंजूर न झाल्यास सोमवार दि. 15 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी आंदोलनात एच. पी. खैरनार, श्रीमती के. एम. सावळे, श्रीमती एस.पी. पवार, श्रीमती ए. के. पेरकेवाड, एन .एफ.कगले, एल .डी. थोरात, डी. डी. चौधरी, जी.बी. सलाव्वन, एस. एस. उशिरे, एस. एस. जाधव, उमेश गोपनारायण आदी सहभागी झाले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम