Deola | घरफोडी करणाऱ्या आरोपींना पकडण्यात देवळा पोलिसांना यश

0
22

Deola | देवळा शहरात सप्तश्रृंगीनगर मध्ये गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीतील दोन मुख्य आरोपींना पकडण्यात देवळा पोलिसांना यश आले आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.  शांताराम राजाराम निकम (रा. सप्तश्रृंगीनगर, कळवण रोड, देवळा)  यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात (दि. ४) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि. दिपक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर हे करीत होते.

कांद्याचे दर पाडण्यासाठी केंद्राची बैठक ?

सदर गुन्हयाच्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती. माधुरी केदार कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी.संजय बाबळे यांच्या आदेशानुसार देवळा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर सहा. पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी पोलीस उप. निरीक्षक कैलास गुजर, पोलीस नाईक राहुल शिरसाठ, ज्योती गोसावी, योगेश जामदार, शरीफ शेख, श्रीमती पवार यांचे पथक नेमून त्यांनी घरफोडी करणारे आरोपी सागर खंडेराव पिंपळकर (रा. निवाणे ता. कळवण),  ज्ञानेश्वर संजय वाघ (रा. सप्तश्रृंगीनगर, देवळा)  यांना ताब्यात घेवुन सखोल चौकशी केली असता त्यांनी शांताराम निकम यांच्या बंद घराचे कुलुप आणि कडीकोयंडा तोडुन घरात प्रवेश करुन सुमारे ५ लाख ५४ हजार ४०० रुपये किमंतीच्या सोन्या चांदीचे दागिणे आणि रोख-रक्कम चोरुन नेल्याची कबुली दिली आहे.

Teacher Recruitment| राज्यात ३० हजार रिक्त शिक्षकांची भरती लवकरच; दीपक केसरकर

आरोपींनी सदर घरफोडीतील सोन्या-चांदीचे दागिणे कळवण, देवळा आणि मालेगाव येथे सराफ दुकाणदारांना विकले होते. पोलिसांनी आरोपींकडुन सोन्या चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असे ४ लाख ५८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, आरोपींना कळवण न्यायालयात हजर केले असता त्यांना दिड दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास स.पो.नि. दिपक पाटील यांच्या मार्गदशर्नाखाली पो.उ.नि. कैलास गुजर, पो. कॉ. योगेश जामदार करीत आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here