Deola PI: अर्ध्या रात्री फोन करा मी तुमच्या सेवेत असेन – बारवकर

0
9
देवळा येथील नवनियुक्त पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांचा सत्कार करताना उपनगराध्यक्ष अशोक आहेर समवेत गटनेते संजय आहेर ,माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर ,अतुल आहेर ,मनोज आहेर आदी (छाया - सोमनाथ जगताप )

Deola PI : अर्ध्या रात्री फोन करा ,जनतेच्या कामासाठी केव्हाही हजर असेन देवळा पोलीस ठाण्यात कमर्चारी वर्ग अपुरा असल्यामुळे कामात थोड्याफार प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत वरिष्ठांशी बोलून हि समस्या लकरच मार्गी लागणार असून याकामी जनतेचे सहकार्य देखील अपेक्षित आहे ,असे आवाहन नवनियुक्त पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी केले. देवळा नगरपंचायतीच्या वतीने नवनियुक्त पोलीस निरीक्षक समीर बारवरकर यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी ते बोलत होते . Deola PI

देवळा येथील नवनियुक्त पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांचा सत्कार करताना उपनगराध्यक्ष अशोक आहेर समवेत गटनेते संजय आहेर माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर अतुल पवार मनोज आहेर आदी छाया सोमनाथ जगताप

देवळा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता जनतेची सुरक्षा देखील तितकीच महत्त्वाची असून,शहरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच आठवडे बाजारातून मोबाईल चोरीस जाणे तसेच दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. याला आळा घालण्याचे काम करण्यात यावे ,अशी मागणी यावेळी माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर यांनी केली . तालुक्यात अपघात तसेच इतर छोट्या मोठ्या घटना घडतात. मात्र ,अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे घटनास्थळी पोलीस वेळेत दाखल होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येते .पोलीस ठाण्यात ताटकळत राहावे लागते.

Gol Gappe Benefits: पाणी पुरी ही आरोग्यासाठी फायदेशीर? अनेक रोग बरे करू शकतात! जाणून घ्या ५ फायदे

याकामी पोलिसांची कमतरता भासत असल्याची समस्या आपण वरिष्ठांच्या कानावर घातली आहे. ती समस्या लवकर दूर होऊन जनतेला न्याय मिळवून देण्याची ग्वाही पोलीस निरीक्षक (deola pi) बारवकर यांनी यावेळी दिली .

याप्रसंगी गटनेते संजय आहेर, उपनगराध्यक्ष अशोक आहेर, माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर ,अतुल पवार , नगरसेवक मनोज आहेर ,नानू आहेर ,हितेश आहेर आदींसह प्रदीप आहेर , किशोर आहेर , सुनील भामरे , मुख्याधिकारी शामकांत जाधव ,दीपक सूर्यवंशी ,सचिन भामरे उपस्थित होते . सूत्रसंचालन सुधाकर आहेर यांनी केले .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here