देवळा : येथिल कै. सौ. शांताई काशिनाथ आहेर नागरी सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. मंगळवारी दि २० रोजी या संस्थेच्या चेअरमन, व्हा चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी सहकार अधिकारी वसंत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली .यावेळी सर्वानुमते चेअरमन पदी जिभाऊ दगा शिंदे यांची तर व्हा. चेअरमन पदी .गोकुळ विठ्ठल आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
यावेळी संचालक डॉ.देवेंद्र चव्हाण, दशरथ पूरकर, निकेश जाधव, विजय पाटील, संदेश गुंजाळ, गणेश वराडे, सतिश पवार, डॉ.रेखा आहेर श्रीमती.मंगाला सोनवणे, मॅनेजर सौ.रूपाली आहेर, कॅशियर जयश्री मेधणे ,मदतनीस श्रीमती आशा जाधव उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.नूतन पदाधिकाऱ्यांचे संस्थापक अध्यक्ष किशोर आहेर, संस्थापक उपाध्यक्ष अमोल मेधणे ,योगेश देवरे समीर भावसार आदींनी अभिनंदन केले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम