
देवळा : मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात देवळा तालुका भाजपच्या वतीने आज शनिवारी(दि २५ ) रोजी निषेध व्यक्त करण्यात येऊन पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे. याबद्दल ते काहीच बोलत नाही .

Murder – जायखेडा (बागलाण) येथे प्रियकरासह मिळून पत्नीने केली पतीची निर्घृण हत्या
राहुल गांधी यांनी ”मोदी ” या आडनावावरून अपमानास्पद टिप्पण्णी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केला. न्यायालयाने या बद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. याचा देवळा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येऊन पोलीस उप निरीक्षक महेश शिंदे ,ज्योती गोसावी यांना निवेदन सादर केले. यावेळी तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण,शहर अध्यक्ष अतुल पवार ,उप नगराध्यक्ष किशोर आहेर ,नगरसेवक मनोज आहेर, कैलास पवार, करण आहेर, भूषण गांगुर्डे आदींसह संजय कानडे, भाऊसाहेब आहेर,किशोर आहेर, विजय आहेर, सागर देवरे, बाबाजी पाटील, हर्षद भामरे, हर्षद मोरे, दिनेश मोरे आदी उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम