सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांनी येथे केले. रविवारी (दि. ९) रोजी देवळा येथे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभासद नोंदणी शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांच्या हस्ते पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे फॉर्म भरून घेण्यात आले. तालुक्यातून जास्तीत जास्त सभासद होणे कामी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात येऊन आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत पक्षाच्या सभासदांनाच उमेदवारी दिली जाणार आहे. तसेच गट व गण निहाय प्रमुखांची नेमणूक लवकरात लवकर करण्यात यावी. तसेच गावपातळीवर नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी परिश्रम घ्यावेत आदी पक्षाची ध्येय धोरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बाजार समितीचे सभापती योगेश आबा आहेर, तालुका अध्यक्ष यशवंत शिरसाठ, माजी संचालक जगदीश पवार, नगरसेवक संतोष शिंदे, अतुल आहेर, बाळासाहेब मगर, जगन्नाथ आव्हाड, भाऊसाहेब वाघ, गणेश आहेर, बंडू आहेर, दिगंबर पवार, संदीप ठुबे, मयूर सोनवणे आदी उपस्थित होते. आभार तालुका अध्यक्ष यशवंत शिरसाठ यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम