सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | खर्डे (ता. देवळा) येथील हनी बनी इंग्लिश मिडीयम स्कुलचे वार्षिक स्नेह संमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी सहा वाजता स्नेह संमेलनाला सुरुवात झाली. यावेळी स्कुलच्या चिमुकल्यांनी विविध गाण्यांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत आपल्या कलाविष्काराने उपस्थितांचे मने जिंकली. स्नेह संमेलनात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी मराठी अभिनेत्री सोनाली सातपुते, मॉडेल अँकर तौसिफ सय्यद यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रेमी उद्योजक अरुण पवार, नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे, अकलूज येथील पोल्ट्री उद्योजक नानासाहेब पवार, प्राचार्य संजय आहेर, पत्रकार सोमनाथ जगताप, एसबीआय लाईफचे मालेगाव एरिया व्यवस्थापक रोशन आहेर हे उपस्थित होते.
Deola | एस.के.डी. व व्ही.के.डी. विद्यार्थ्यांची टेनिस बॉल क्रकेट स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर निवड
प्रमुख पाहुण्यांचा स्कुलचे संचालक – किरण जाधव, प्राचार्या – वैशाली जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विकास सोसायटीचे चेअरमन अनिल देवरे, संचालक वसंत जाधव, संदीप पवार, माजी उपसरपंच राहुल देवरे, उपसरपंच भाग्यश्री पवार, सुनील जाधव, सुरेश जाधव, यशवंत देवरे, प्रहार संघटनेचे कृष्णा जाधव, मधुकर देवरे, हर्षद मोरे आदींसह पालक स्वराज्य ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक निशा केदारे, संध्या देवरे, पूजा चव्हाण, अनिता निरभवणे, कावेरी सावंत, प्रियांका जाधव, धनश्री जगताप, गीतांजली जाधव, वैशाली कुवर, सोहम शिरसाठ, सनी वाघ, संदीप खरे, निलेश सोनवणे, रोशन गांगुर्डे, आबा जगताप, सिमा जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार किरण जाधव यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम