देवळा तालुका राष्ट्रवादी तर्फे शिंदे सरकार विरोधात जोरदार निदर्शने

0
24
देवळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यसरकाच्या निषेधार्थ खोके आंदोलन करून पोलीस उप निरीक्षक विक्रांत कचरे यांना निवेदन देतांना तालुका अध्यक्ष यशवंत शिरसाठ समवेत बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, युवक तालुका अध्यक्ष सुनील आहेर,जि प च्या माजी सभापती उषाताई बच्छाव आदी (छाया /सोमनाथ जगताप)

देवळा ; देवळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डोक्यावर खोके घेऊन “आपला ओके” कारभार करणाऱ्या भ्रष्ट राज्यकर्त्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येऊन आज मंगळवारी( दि २० )रोजी पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले.

देवळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यसरकाच्या निषेधार्थ खोके आंदोलन करून पोलीस उप निरीक्षक विक्रांत कचरे यांना निवेदन देतांना तालुका अध्यक्ष यशवंत शिरसाठ समवेत बाजार समितीचे सभापती योगेश आहेर युवक तालुका अध्यक्ष सुनील आहेरजि प च्या माजी सभापती उषाताई बच्छाव आदी छाया सोमनाथ जगताप

सध्या कांद्या सह कोणत्याही शेती मालाला योग्य बाजार भाव मिळत नाही, तसेच बेरोजगारी, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा गलथान कारभार करणाऱ्या सत्ताधारी गद्दार नेत्यांच्या कारभारावर जनता नाराज असून ,त्याच्या निषेधार्थ आज मंगळवारी( दि. २०) रोजी देवळा बस स्टँड पासून ते पोलिस स्टेशन पर्यंत मोर्चा काढून खोके दाखवून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला . व पोलीस उप निरीक्षक विक्रांत कचरे यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी तालुका अध्यक्ष यशवंत शिरसाठ ,प्रांतिक सदस्य व बाजार समितीचे सभापती योगेश आबा आहेर,बाजार समितीचे माजी संचालक पंडितराव निकम ,जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पवार ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस देवळा तालुका अध्यक्ष सुनिल (गोटू आबा) आहेर , नगरसेवक संतोष शिंदे, शेतकी संघाचे चेअरमन कैलास देवरे , शहर अध्यक्ष दिलीप आहेर , महिला तालुका अध्यक्षा व जि प च्या माजी सभापती श्रीमती उषाताई बच्छाव, जि प च्या माजी सदस्या श्रीमती नुतन आहेर ,श्रीमती वनिता शिंदे , सरला सोनवणे, जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, धनंजय बोरसे,मयूर सोनवणे, सचिन बोरसे, बापू शिंदे, दत्तू आहेर, सतिष सूर्यवंशी आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here