देवळा ; वेदांत फॉक्सकॉर्न तसेच अति पावसाने नुकसान झालेलय शेती पिकांसाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व वाढत्या चोरींना आळा बसविण्यात यावा आदी विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले .
निवेदनाचा आशय असा कि , महाराष्ट्रात लाखो कोटींचा उदयोग सुरू करून तरूणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणारा वेदांत फॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्र सोडून गुजरातला गेल्याचे वृत्त म्हणजे राज्य सरकारचे अपयश आहे . यासाठी केंद्र सरकारकडे मध्यस्थी करून हा वेदांत फॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्रात परत आणावा , पावसाने शेतपिंकाचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असून , शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत .
शासनाने नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतक – यांना ५० हजार रूपये प्रति एकरी नुकसान भरपाई म्हणून र मदत द्यावी , लंपी आजारामुळे शेतक – यांची गुरे मरत असून त्यांना सरकारने त्वरित भरपाई द्यावी . तसेच या आजाराची लस सरकारतर्फे मोफत उपलब्ध करून द्यावी, जिल्हा नियोजन मंडळाच्या मंजूर कामांना . मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने नाशिक जिल्हयातील सर्व कामे बंद पडल्याने नागरीकांचे हाल होत आहेत या सर्व कामांची स्थगिती तात्काळ उठवण्यात यावी व त्वरित पालकमंत्री नियुक्त करून नाशिक जिल्हयातील सार्वजनिक कामांना सुरुवात करावी, देवळा शहर व तालुकयातील ग्रामीण भागात भुरट्या चोरीचे प्रमाण वाढले असून , पोलिसांनी याला वेळीच आवर घालावा आदी मागण्याचा निवेदनात समावेश आहे .
यावेळी ” गुजरातला खोके ,महाराष्ट्राला धोके” अशा प्रकारच्या घोषणा देऊन राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला . याप्रसंगी प्रांतिक सदस्य योगेश आहेर ,जेष्ठ नेते पंडितराव निकम , तालुका अध्यक्ष यशवंत शिरसाठ , महिला तालुका अध्यक्षा उषाताई बच्छाव , वनिता शिंदे , हेमलता खैरणार , युवक तालुका अध्यक्ष सुनील आहेर , शहर अध्यक्ष दिलीप आहेर , जिल्हा सरचिटणीस जगदीश पवार , महेंद्र आहेर , पी डी निकम , नगरसेवक संतोष शिंदे , कुबेर जाधव , संजय सावळे ,चिंतामण आहेर , दीपक निकम , श्रीकांत अहिरराव , डॉ कृष्णा अहिरे , राजेश आहेर , तकदीर कापडणीस , सचिन सूर्यवंशी , सतीश सूर्यवंशी ,दत्तू आहेर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम