देवळ्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने काठी वाटप

0
31
देवळा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिना निमित्ताने वृध्द महिलांना काठी वाटप करतांना महिला अध्यक्षा उषाताई बच्छाव आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त देवळा येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा व जि प च्या माजी सभापती उषाताई बच्छाव यांच्या हस्ते देवळा बसस्टँडवर ज्येष्ठ महिला (वृद्ध )यांना काठी वाटप करण्यात आल्या .

देवळा – राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिना निमित्ताने वृध्द महिलांना काठी वाटप करतांना महिला अध्यक्षा उषाताई बच्छाव आदी (छाया – सोमनाथ जगताप )

याप्रसंगी तालुका अध्यक्ष यशवंत शिरसाठ , युवक तालुका अध्यक्ष सुनिल आहेर ,शहर अध्यक्ष दिलीप आहेर, मनोज गुजरे, महिला शहर अध्यक्षा वनिता शिंदे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . पक्षाच्या वर्धापनदिन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here