Deola | स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निफाड येथे जिल्हास्तरीय बैठक

0
1
Deola
Deola

देवळा | स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हा बैठक शनिवारी दि. २५ रोजी निफाड येथे शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात असून या बैठकीमध्ये राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनांच्या अनुषंगाने विशेषता शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजेत ही प्रमुख मागणी तसेच कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवावे तसेच सोयाबीन हमीभावाचे पोर्टल थोड्या काळा करताना चालू ठेवून शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या सरकारचा या बैठकीत निषेध करण्यात येणार आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शेतकरी प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्ह्यात गावगाड्यातील शेतकऱ्यांचा प्रवेश करून व शेतकरी प्रश्नावर जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने बैठकीत संघटनात्मक बांधणी तयार करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून जिल्ह्यात जाळे निर्माण व्हावे म्हणून संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी नेतृत्वाला नवीन तरुणांची ताकद तयार करून शेतकरी प्रश्नावर आवाज उठवणार असल्याचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील, सुधाकर मोगल यांनी यावेळी सांगितले.

Dada Bhuse | शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची देवळा तालुक्यातील शाळांना अचानक भेट

या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून राज्य समन्वयक कुबेर जाधव, पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र शिरसाठ, कृष्णा घुमरे, तुषार शिरसाट, अशोक शेवाळे, आत्माराम पगार, गजानन घोटेकर, मच्छिंद्र जाधव, रवींद्र शेवाळे, भाऊसाहेब तासकर, संजय जाधव, रवींद्र तळेकर, कैलास कोकरे, बंडु आढाव, कळवण तालुका अध्यक्ष रामकृष्ण जाधव, संदीप उपाळे आदी उपस्थित राहणार आहे. बैठकीस जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here