Deola | कांदा निर्यात बंदी विरोधात देवळ्यात ‘रास्ता रोको’

0
25
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  कांदा निर्यात बंदी मुळे कांद्याचे दर घसरले असून, शेतकरी विरोधी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ माघे घ्यावी या मागणीसाठी शुक्रवारी (दि ९ ) रोजी दुपारी दीड वाजता देवळा येथे पाचकंदीलवर स्वंतत्र भारत पक्षाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रवीण आहिरे, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष
शैलेंद्र कापडनिस, देवळा तालुका अध्यक्ष माणिक निकम यांच्या नेतृवत्वाखाली ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.

जवळपास अर्धा ते पाऊण तास सुरु असलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे ‘देवळा-नाशिक’ मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली होती. पोलीस उपनिरीक्षक डी.पी काळे यांना निवेदन देऊन हे आंदोलन माघे घेण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, प्रवीण आहिरे, शैलेंद्र कापडनिस, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, देविदास आहेर, विनोद आहेर आदींनी शेतकरी विरोधी असलेल्या केंद्र सरकारवर सडकून टीका केली. गतवर्षी ८ डिसेंबरला कांदा निर्यात बंदीचा आदेश जारी केला.

Deola | देवळा येथे स्वामी समर्थ मंदिरात धाडसी चोरी ; देवळा पोलिसांसमोर आव्हान

त्यानुसार शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२४ पर्यंत कांद्याची निर्यातबंदी केली आहे. मात्र, कांदा निर्यात बंदी केल्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सद्यस्थितीत उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. याआधी कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लादून जवळपास अघोषित निर्यात बंदी लादली आहे. त्यातून सावरत कांद्याला योग्य दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली असताना केंद्र सरकारने पुन्हा कांदा निर्यात बंदी करुन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणले. या संदर्भात केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली आहे. असा आरोप करण्यात आला.

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी असून, सत्ताधारी केंद्र व राज्य सरकारमधील मंत्री, खासदार व आमदार आदी लोकप्रतिनिधींनी शेतमालाच्या कोसळलेल्या भावाबाबत मौन बाळगले आहे. कांदा निर्यात बंदी माघे न घेतल्यास येऊ घातलेल्या निवडणुकीत शेतकरी त्यांना त्यांची जागा दाखवून देतील अशा पद्धतीने नाराजी व्यक्त केली. याची सरकारने दाखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. विविध मागण्याचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. आंदोलनात शेतकरी संघटनेचे देवळा तालुका उपाध्यक्ष किरण निकम, डॉ. राजेंद्र ब्राह्म्णकर, शिवसेना उबाठा गटाचे नंदू जाधव, विलास शिंदे आदींसह स्वप्नील आहेर, संदिप निकम, मनोज आहेर, विशाल निकम, हेमंत निकम, तानाजी निकम, कैलास कोकरे, माधव निकम, हरिचंद्र निकम, विठ्ठल महाजन, केदा निकम आदी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here