सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | चांदवड-देवळा मतदारसंघातील माय बाब जनता माझ्या बरोबर आहे. यामुळे माझा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन अपक्ष उमेदवार केदा आहेर यांनी लोहोणेर ता. देवळा येथील प्रचार सभेत केले.
Deola | पिंपळगाव येथील जनता विद्यालयात कर्मवीर डी. आर. भोसले यांना अभिवादन
काय म्हणाले केदा आहेर?
“राज्यात अपक्षांच्या टेकू शिवाय सरकार बनणार नाही, यामुळे मी आमदार म्हणून मुंबईत मतदारसंघातील सर्व प्रश्न घेऊन जाणार आहे. हे सर्व प्रश्न शासनाला वेठीस धरून सोडवून घेऊन आपणास न्याय देणार आहे. मतदार संघातील ज्वलंत समस्या मार्गी लावण्यासाठी विद्यमान आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली नाही. यामुळे दोन्ही तालुक्यातील जनता त्यांच्यावर नाराज आहे. मात्र मी याकामी माझी आमदारकी जनतेसाठी पणाला लावण्यासाठी मागेपुढे पहाणार नाही. माझ्या भावासह पक्षाने माझ्याव अन्याय केला. तुमच्याकडे आज मी न्याय मागायाला आलो आहे. माझी विरोधकांकडून बदनामी केली जात असून, मी आहे तोपर्यंत येथील वाळूचा लिलाव होऊ देणार नाही. मला चुकीचे काम करायला आवडत नाही. आज मला तुमचा पाठिंबारुपी, आशीर्वादाची गरज आहे. लोहोणेर गाव हे माझे कवच कुंडल आहे, असे समाजा. माझ्या सोबत असणाऱ्यांना आपण कदापि विसरणार नाही, आपण कुठल्याही भूलथापांना बळी न पडता मला मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत.” असे शेवटी केदा आहेर म्हणाले.
Deola | कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात मतदान जनजागृती
यावेळी गावातील महिला-पुरुष मतदार मोठ्या संख्येने उपस्थित
यावेळ माजी सरपंच निबा धामणे, खामखेड्याचे सरपंच वैभव पवार, बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, मविप्रचे संचालक विजय पगार, ह. भ. प. अविनाश महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी भाऊसाहेब पगार, बापू देवरे, रमेश अहिरे, राकेश गुळेचा, भैया निकम, हरिशिंग परदेशी, अनिल धामणे, पंडित शेवाळे, बंडू परदेशी, मोठाभाऊ बागुल सुनील महाजन, डॉ. जगदीश धामणे आदींसह लोहोणेर गावातील महिला-पुरुष मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम