सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | उत्पन्न दाखल्यावर छेडछाड करून नॉन-क्रिमेलयर प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याने प्रशासन नायब तहसीलदार दिनेश शेलुकर यांच्या फिर्यादी वरून उमराणे येथील अर्जदार आणि सेतू केंद्र चालकावर देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळा येथे उत्पन्न दाखल्यावर छेडछाड करून नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे.
Deola | चांदवड विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून दिगंबर जाधव यांना उमेदवारी
अर्जदाराने सेतू केंद्र चालकाच्या मदतीने कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा गंभीर प्रकार प्रशासनाच्या सतर्कतेने निदर्शनास आला आहे. याप्रकरणी उमराणे येथील अर्जदार आणि सेतू केंद्र चालकावर देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसील प्रशासनाने या कृत्याची गंभीर दखल घेतली असून, चांदवड उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
भारतीय न्याय संहिता ३३६/२ प्रमाणे गुन्हा दाखल
देवळा पोलीस ठाण्यामध्ये तहसील प्रशासनाने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, उत्पन्नाच्या दाखल्याची पडताळणी करत असताना गैरप्रकार उघडकीस आला. उमराणे येथील अरुण लक्ष्मण देवरे यांच्या उत्पन्नाच्या दाखल्यात फेरबदल करून जितेंद्र विजय देवरे यांनी सेतू केंद्र चालक सुरेश रमेश झाडे यांच्या साहाय्याने खोटा दस्त बनवून तो नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी सादर केला. तसेच उत्पन्न दाखला स्वतःच्या नावाने न काढता दुसऱ्याच्या दाखल्यात छेडछाड करून स्वतःचाच दाखला असल्याचे भासवून नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. मात्र दाखल्याचा बारकोड तपासणी केला असता, तो दाखला दुसऱ्याच्या नावे असल्याचे सिद्ध झाल्याने चांदवड उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी नायब तहसीलदार दिनेश शेलुकर यांना प्राधिकृत करीत सेतू केंद्राचे चालक सुरेश रमेश झाडे आणि अर्जदार जितेंद्र विजय देवरे यांच्यावर देवळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता ३३६/२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर करीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम