Deola | चांदवड-देवळा मतदारसंघात ‘नाना की दादा ‘ आज मुंबईत फैसला

0
34
Deola
Deola

विकी गवळी- प्रतिनिधी: देवळा | देवळा विधानसभा मतदारसंघाचे तिकीट ‘नानांना की दादांना’ या बाबत आज मुंबईत ठरणार आहे. आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. डॉ. राहुल आहेर व इच्छुक उमेदवार केदा आहेर दोन्ही बंधू या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अनेक दिवसांपासून चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात ‘नाना की दादा’ अशी चर्चा रंगली होती. मात्र चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत चुलत भाऊ व नाफेडचे संचालक केदा आहेर यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र भाजपाची पहिली यादी जाहीर झाल्याने व पहिल्याच यादीत आमदार राहुल आहेर यांचे नाव जाहीर झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र काल दि. 20 रोजी आमदार राहुल आहेर यांनी कार्यकर्ता मेळावा घेत केदा आहेर यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी मी आज मुंबईत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ याबाबत काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण चांदवड-देवळा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

Deola | चांदवड-देवळ्याच्या राजकारणाला रंजक वळण; राहुल आहेर उमेदवारी मागे घेण्यावर ठाम

निवडणूक लढण्यास केदा आहेर ठाम!

गेल्या अनेक वर्षांपासून केदा आहेत. हे समाज कार्यात सक्रिय आहेत. डॉ. राहुल आहेर यांना आमदारकी मिळवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. २०१४ पासून इच्छुक असलेले केदा आहेर मात्र काका स्व. मंत्री दौलतराव आहेर यांच्या शब्दाला मान देत त्यांनी चुलत भावाला आमदारकीसाठी मदत केली व निवडूनही आणले मात्र यावेळी केदा आहेर निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने “तिकीट नाही मिळाले, तरी दुसरे अनेक पर्याय आहेत.” असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते. त्या अनुषंगाने त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला, गावोगावी मेळावे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. केदा आहेर निवडणूक लढण्यास ठाम असल्याने स्पष्ट आहे.

Assembly Election | भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नाशिकमधून कोणाला मिळाली संधी??

दोन्ही आहेर बंधू उभे राहिल्यास २०१४ ची पुनरावृत्ती.

२०१४ साली चांदवड मधून मा. आमदार शिरीष कोतवाल व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ.आत्माराम कुंभार्डे दोन्ही उमेदवार उभे राहिल्याने मतांचे विभाजन होऊन डॉ. राहुल आहेर यांना विजयश्री प्राप्त झाला होता. यावेळी जर दोन्ही भाऊ उभे राहिले तर मतांचे विभाजन होऊन तिसरा उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here