सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या देवळा तालुक्यातील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा हा उद्या मंगळवार (दि. ३०) रोजी आ. डॉ. राहुल आहेर व भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
Deola | विकासकामे पुढीलप्रमाणे –
- पाटणे – निंबोळा, लोहोणेर, विठेवाडी स्त्याची सुधारणा करणे. (कारखाना ते नेपाळी फाटा),
- विठेवाडी येथील तलाठी कार्यालय,
- वसाका ते आदिवासी आश्रमशाळा स्त्याची सुधारणा करणे,
- विठेवाडी येथे वाचनालयाचे बांधकाम करणे,
- बाभूळफाटा ते दत्तमंदिर स्त्याची सुधारणा करणे,
- माळवाडी येथे तलाठी कार्यालय बांधणे,
- आराई ते वासोळ, खालप, माळवाडी रस्ता (गावांतर्गत काँक्रीटीकरण करणे),
- माळवाडी गावांतर्गत जोडरस्त्याचे काँक्रीटीकरण करणे,
- वाजगाव येथे वडाळा ते कोलथे शिवार गाढे वस्ती रस्त्याची सुधारणा करणे,
- वाजगाव येथे हनुमान मंदिरालगत संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे, जि. नाशिक तलाठी कार्यालय,
- वार्शी येथे तलाठी कार्यालय बांधणे,
- मुलुखवाडी ते सोनवणे वस्ती रस्त्याची सुधारणा करणे,
- मुलुखवाडी ते वार्शी रस्ता सुधारणा करणे
आदी वरील कामांचा समावेश आहे. देवळा तालुक्यात आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून विकास कामे ही प्रगती पथावर असून नागरिकांना अनेक सुख सुविधा उपलब्ध झाल्याने तालुक्यातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी संबधित गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हा चेअरमन, संचालक व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे तालुका अध्यक्ष अतुल पवार यांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम