सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मराठा विद्या प्रसारक समाजाचे आडगाव येथील डॉ.वसंतराव पवार हॉस्पिटल येथे कसमादे पट्टयातून बसद्वारे येणाऱ्या रुग्णांसाठी परिवहन महामंडळाने उड्डाण पुलाच्या खाली बस थांबा द्यावा, अशी मागणी देवळा येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटील यांनी केली आहे.याबाबत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आडगाव येथील रुग्णालयात कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव येथील संस्थेचे बहूसंख्य सभासद व गोरगरीब रुग्ण हे मोठ्या प्रमाणात येत असतात.(Deola)
Deola | देवळा महाविद्यालयाचे उपप्राचार्य बापू रौंदळ यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार
परंतु सटाणा, मालेगाव, नंदुरबार, साक्री, नवापुर आगाराच्या बसेसमध्ये रुग्णांनी विनंती करून देखील बस उड्डाण पुलावरून नेऊन रुग्णालयापासून दोन किमी अंतरावर थांबविले जाते. त्यामुळे दीर्घ आजार असणाऱ्या रुग्णांचे इतर वाहनांची सुविधा नसल्याने मोठ्या प्रमाणात हाल होतात. तरी बसमधील वाहकाला रुग्णांनी विनंती केली असेल तर बस उड्डाण पुलावरून न जाता उड्डाणपुलाखाली थांबवली. तर रुग्णांना रुग्णालयात जाणे सोपे होईल. तरी राज्य परिवहन महामंडळाने संबंधित आगार प्रमुखांना तशा सूचना द्याव्यात व रुग्णांचे हाल थांबवावे असे शिवाजी पाटील यांनी सांगितले.(Deola)
Deola | देवळा येथे चारही मार्गांवर वाहतुक कोंडी; चार पोलिसांवर वाहतूकीचा भार
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम