Deola | देवळा शहरात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती

0
37
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  व्यसनामुळे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या शरीराला हानिकारक असलेल्या व्यसनांपासून नागरिकांनी दूर राहावे ह्या जनजागृती साठी देवळा शहरात व्यसनमुक्ती संघटनेच्या वतीने होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. नागरिक मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन झाले असून, यात बहुतांश तरुण वर्ग गुटखा, सिगारेट, दारू तसेच सुगंधी तंबाखूचे सेवन करतांना आढळून येत आहेत. यामुळे अनके जणांना आजाराची व्याधी लागून मृत्युमुखी पडले आहेत.

Deola | देवळा येथे महाशिवरात्री निमित्ताने भाविकांना प्रसाद, आणि महिलांना पर्स वाटप 

गुटखा विक्री बंद असतांना देखील शहरासह खेड्यापाड्यात आजही मोठ्या प्रमाणात गुटख्याची सर्रास विक्री सुरु आहे. काही ठिकाणी बनावट दारू देखील मिळत असल्याचे समजते. ह्या सर्व व्यवसायांवर तात्पुरती कारवाई करण्यात येत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, व्यसनामुळे अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. यामुळे अनेक कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला आहे. या व्यसनांपासून दूर राहावे व नागरिकांनी निरोगी आयुष्य जगावे, यासाठी देवळा शहरात “तुमच्या कुटूंबाला तुम्ही हवे आहात, त्याचा विचार करा आणि गुटखा सोडा” या आशयाचे होर्डिंग लावून व्यसनमुक्ती संघटनेच्या वतीने जनजागृती करण्यात आली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here