Deola | देवळा येथील शिंदे वाडीत घराला आग; आगीत ३ लाखांची रोकड जळून खाक

0
22
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी देवळा |  येथील देवळा -खर्डे रस्त्यावरील शिंदे वाडीतील एका बंद घराला आज मंगळवारी (दि १३) रोजी दुपारी १ वाजता विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घरातील रोख रक्कम ३ लाख ६० हजार रुपयांसह घरातील संसार उपयोगी असे एकूण १४ लाख १५ हजार रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले. देवळा नगरपंचातीचे अग्निशमन बंब वेळेत पोहचल्याने कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली व पुढील अनर्थ टळला.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, आज दुपारी एक वाजेच्या सुमारास देवळा येथील शिंदे वाडीत राहणारे विनोद बाजीराव शिंदे यांच्या बंद घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. यावेळी घरातून धूर येत असल्याचे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या लक्षात येताच घटनास्थळी स्थानिक व इतरांनी धाव घेतली. वीज वितरण कंपनीला याची कलपना दिल्यावर येथे तात्काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढून आग विझविण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी देवळा नगरपंचातीचे अग्निशमन बंब वेळेत पोहचल्याने आग आटोक्यात आली व पुढील अनर्थ अनर्थ टळला.(Deola)

Congress | इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांचाही काँग्रेसला रामराम..?

घरात आगीने रौद्र रूप धारण केल्याने घरातील रोख रकमेसह मौल्यवान वस्तू यात जळून खाक झाल्याने शिंदे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीत रोख रक्कम ३ लाख ६० हजार रुपये, सोने १ लाख ८० हजार, संसार उपयोगी वस्तू ५ लाख, टीव्ही ४५ हजार, फर्नीचर १ लाख ५० हजार, सिलिंग व पियूईपी ४० हजार, लोखंडी कपाट ६० हजार, फ्रिज, फॅन आदी ५० हजार, पलंग ३० हजार असे एकूण १४ लाख १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Deola | विजयनगर येथे हळदि कुंकु कार्यक्रम उत्साहात पार पडला

या घटनेचा देवळ्याचे तलाठी उमेश गोपनारायण यांनी पंचनामा केला आहे. या घटनेमुळे देवळा शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. याकामी उपनगराध्यक्ष मनोज आहेर, माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, लक्ष्मीकांत आहेर, गटनेते संजय आहेर, किशोर आहेर, प्रदीप आहेर, पंकज आहेर, राजेंद्र आहेर आदींसह नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here