सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | राज्य शासनाच्या शंभर दिवसाच्या सात कलमी कृती आराखडा योजने अंतर्गत येथील बाजार समितीच्या आवारात बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, माजी संचालक जगदीश पवार, नगरसेवक संतोष शिंदे, शेतकी संघाचे चेअरमन संजय गायकवाड, शिवसेनेचे विजय जगताप, विनोद देवरे, संजय मांडगे, राजेंद्र आहेर, श्रावण आहेर, सहकार अधिकारी ज्ञानेश्वर आहिरे, सचिव माणिक निकम आदींच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेतून संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत ठेवणे, वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांना सेवा उपलब्ध करून देणे, नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर होण्यासाठी प्रयत्न करणे, जनतेच्या तक्रारारींचे त्वरेने निराकरण करणे, लोकशाही दिनाची अंमलबजावणी करणे, कार्यालयातील सोयी व सुविधा उपलब्ध करणे, व्यापारी वर्गाच्या अडचणी चर्चेतून सोडवणे यासारख्या योजना १५ एप्रिल पर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती येथील बाजार समितीकडून देण्यात आली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम