सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | नागरिकांनी थकीत व चालू घरपट्टी तसेच पाणीपट्टी कराचा भरणा ३१ मार्च पर्यंत भरून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी केले आहे. देवळा नगरपंचायतीच्या वतीने थकीत घरपट्टी व पाणीपट्टी मिळकतधारकांवर नळ कनेक्शन खंडित करण्याची व मालमत्ता जप्तीची धडक कारवाईची राबविण्यात आली असून थकबाकीदारांना नळ कनेक्शन खंडित करण्याच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत. यामुळे नियमीत थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
Deola | कणकापूर येथे भरदिवसा शेतमजुराच्या घरी चोरी
देवळा नगरपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकीत असल्याने पाणीपुरवठा विभागाला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. थकीत वसुली कामी मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली नळ कनेक्शन खंडित करण्यासाठी विशेष मोहिमेअंतर्गत पाणीपुरवठा विभाग व कर विभागामार्फत नळ कनेक्शन खंडित करण्याची धडक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. मिळकतधारकांनी व नळ कनेक्शनधारकांनी आपल्या कडील थकबाकी ३१ मार्च पूर्वी भरून नगरपंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन शेवटी मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम